कलामहर्षी के.की.मूस ग्रंथालयात दिनेश चव्हाण यांनी दिले पुस्तके भेट


Dinesh Chavan donated books to the Kalamaharshi K.K. Moos Library चाळीसगाव (4 जानेवारी 2026) : शहरातील कलामहर्षी के.की,.मूस आशीर्वाद सार्वजनिक वाचनालयात चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी नुकतीच आपली साहित्यसंपदा भेट म्हणून दिली. त्यात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन झालेला व पुणे येथील यशोदीप प्रकाशनने प्रकाशित केलेला चित्रकाव्यसंग्रह ‘अधोरेखित’ व मुंबईत हॉटेल ताज येथे प्रकाशन झालेला आगळावेगळा चित्र चारोळी संग्रह ‘शब्दस्पंदन’ तसेच बुलडाणा येथील साहित्य संमेलनात प्रकाशन झालेला वैचारिक लेख संग्रह ‘बोल हे अंतरीचे’ अशा तीन स्वलिखित ग्रंथांची भेट वाचनालयात देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
वाचनालयाचे ग्रंथपाल मनोज अरविंद घाटे, सायली साळवे कला शिक्षक चेतन कुर्‍हाडे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !