भुसावळातील भोळे महाविद्यालयात सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी


Savitribai Phule Jayanti was celebrated with enthusiasm at Bhole College in Bhusawal भुसावळ (4 जानेवारी 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास समिती अंतर्गत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारणेच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीत पेटवला ज्ञानाचा दिवा
प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले यांनी मनोगतात स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि जातिभेद निर्मूलनासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा दिवा पेटवून समाजाला नवी दिशा दिली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षण व सामाजिक न्यायासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्यांनी व्यक्त केले.



यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी प्रा.श्रीनिवास, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अंजली पाटील, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.डी.चौधरी, एनएसएसएस अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.खिलचंद धांडे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे दीपक महाजन उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !