नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे कवच कुंडल : डीआरएम अग्रवाल यांनी केले स्थानकांचे ‘रॅपिड ऑडिट’

प्रवासी सुविधासह सुरक्षिततेचा घेतला आढावा : नाशिक, देवळालीसह पाच स्थानकांची सखोल तपासणी


Railways provide security cover for the Nashik Kumbh Mela : DRM Agarwal conducted a ‘rapid audit’ of the stations भुसावळ (4 जानेवारी 2026) : आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी भुसावळ रेल्वे विभागाने आतापासूनच कंबर कसली आहे. डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी दोन दिवसांच्या विशेष दौर्‍यात नाशिक रोड, देवळाली, नांदगावसह पाच प्रमुख स्थानकांची सखोल तपासणी केली. ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवत स्थानक स्वच्छता, तांत्रिक सज्जता आणि सुरक्षा यंत्रणेचे त्यांनी रॅपिड ऑडिट केले.

सुविधांची केली पाहणी
दोन दिवसांचे विशेष अभियान शुक्रवार, 2 व शनिवार, 3 रोजी डीआरएम अग्रवाल यांनी विभागीय शाखा अधिकार्‍यांच्या फौजफाट्यासह रेल्वे मार्गावर प्रत्यक्ष उतरून पाहणी केली. शनिवारी सकाळी त्यांनी देवळाली आणि नाशिक रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी केवळ प्रवासी सुविधाच नव्हे, तर रेल्वेच्या तांत्रिक गाभ्याशी संबंधित असलेल्या ‘रिले रूम’ आणि ‘पॅनेल रूम’चीही बारकाईने तपासणी करीत पाहणी केली. कुंभमेळ्याच्या काळात रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण येणार असल्याने तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी त्यांनी अधिकार्‍यांना विशेष सूचना दिल्या. स्वच्छता आणि सुविधेवर लेझर फोकस केला.

कर्मचारी कार्यक्षमतेचा आढावा
शनिवार, 3 जानेवारी रोजी झालेल्या तपासणीत नाशिक स्थानकाचा परिसर, प्रवाशांना मिळणार्‍या मूलभूत सोयी आणि रेल्वे मार्गांचा फिटनेस यावर भर देण्यात आला. यापूर्वी शुक्रवार, 2 जानेवारी रोजी त्यांनी कसबे सुकेने, खेरवाडी आणि ओढा या स्थानकांचीही व्याप्ती तपासली होती. विशेषतः नांदगाव रेल्वे स्थानकातील ‘क्रू लॉबी’ आणि ‘रनिंग रूम’च्या पाहणीतून कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !