पारोळा महामार्गावर ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील विवाहिता ठार तर पती गंभीर
On the Parola highway, a married woman was killed and her husband seriously injured in a collision with a truck while they were on a motorcycle पारोळा (4 जानेवारी 2026) : ट्रक व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मळगाव शिवारात बायपास जोडणीच्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास
घडला. मयत विवाहिता उंदिरखेडे, ता.पारोळा गावातील रहिवासी आहे.
काय घडले दाम्पत्यासोबत?
शुभम भाऊसाहेब बोरसे (25, रा.उंदिरखेडे, ता.पारोळा) हे पत्नी रुपाली शुभम बोरसे (21) सोबत दुचाकी (एम.एच. 19 सी.के. 6252) ने उंदिरखेडे येथून जळगावकडे जात असताना मळगाव शिवारातील जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि नवीन चौपदरी महामार्ग क्र. 53 ला जोडणार्या बायपास रस्त्यावर ते रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एरंडोलकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने (एच.आर.58 ए.फ.1313) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीवरील रूपाली बोरसे या खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


