भुसावळातील द टॅलेंट हबचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग
भुसावळ (4 जानेवारी 2026) : शहरातील टॅलेंट हब या आयआयटी-जेईई आणि नीट परीक्षांच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या अग्रगण्य संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साह, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद तसेच मान्यवर पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलागुणांना मिळाली दाद
विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, आत्मविश्वासपूर्ण मंच सादरीकरण आणि शिस्तबद्ध आयोजन यामुळे द टॅलेंट हबमधील
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास स्पष्टपणे दिसून आला. कार्यक्रमातील सर्वांत भावनिक आणि प्रेरणादायी क्षण म्हणजे नीट आणि
आयआयटी-जेईई परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान. विद्यार्थ्यांची नावे, रँक आणि त्यांचा यश प्रवास जाहीर होताच संपूर्ण
सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले. प्रत्येक यशकथा नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली.










