भुसावळ-जळगाव रस्ता दुरूस्तीमुळे वाहतुकीचा खोळंबा


भुसावळ (5 जानेवारी 2026) : शहरातील जळगाव रस्ता आणि जुना सातारा भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, तेथे रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे एकाच लेनमधून दोन्ही बाजूची वाहतूक होत असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागात वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. जळगाव रस्त्यावरील कामामुळे किरकोळ अपघाताचा घडत आहे. पादचार्‍यांना चालणेही कठीण झाले आहे.

रस्ता कामाला वेग देण्याची अपेक्षा
पालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला तत्काळ रस्ता कामाला वेग देण्याच्या सूचना द्यावेत, अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांकडून केली जात आहे. जुना सातारा भागातील अरुंद आणि खराब रस्त्यांमुळे तासनतास वाहतूक ठप्प होत असल्याने जनसामान्यांमध्ये संताप आहे. पालिकेने तातडीने नियोजन करून रस्त्याचे काम लवकर करावे, अशी मागणी होत आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !