भुसावळात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ : नागरिकांचा जीव मुठीत


भुसावळ (5 जानेवारी 2026) : भुसावळ शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळांत कुत्र्यांच्या टोळ्या मुक्तपणे वावरत असून, केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही पादचारी आणि वाहनधारकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांच्या मागे ही कुत्री धावत असल्याने अनेकदा चालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. त

चिमुकल्यांमम्ये भीतीचे वातावरण
शहरात शाळेत जाणार्‍या लहान मुलांच्या अंगावरही कुत्री धावून जात असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रस्त्यावरून चालणे आता धोक्याचे झाले असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. पालिका प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नसबंदी किंवा इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !