राजकोट-महबूबनगर साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय
भुसावळ (5 जानेवारी 2026) : रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने राजकोट ते महबूबनगर दरम्यान धावणार्या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.
गाडी 09575 राजकोट-महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडी दि. 23 फेब्रुवारीपर्यंत चालविण्यात येणार आहे. तसेच, गाडी 09576 महबूबनगर-राजकोट साप्ताहिक विशेष गाडी दि. 24 फेब्रुवारीपर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. या गाड्यांच्या वेळापत्रकात व थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









