भुसावळातील कोटेचा महाविद्यालयाच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन
The special labor camp of Kotecha College in Bhusawal was inaugurated भुसावळ (5 जानेवारी 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेच्या महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन रविवार, 4 रोजी चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय, साकेगाव येथे झाले. माजी सैनिक उमेश पाटील, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय साकेगावचे प्राचार्य डॉ.माणिक पाटील, विभागीय समन्वयक डॉ.अनिल बारी, प्रभारी प्राचार्य डॉ. जीवन धांडे, कनिष्ठ पर्यवेक्षक व्ही.एस.खरे, सर्व एनएसएस अधिकारी उपस्थित होते.
साने गुरूजींच्या विचारांनी प्रेरीत रासेयो
प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ.मीना चौधरी यांनी केले. उमेश पाटील यांनी देशभक्ती व युवाशक्ती या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सैनिक सेवांमध्ये आलेले अनुभव कथन केले. डॉ.माणिक पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना साने गुरुजी यांच्या विचारांनी प्रेरित आहे व समाजसेवा हा मुख्य उद्देश यात समाविष्ट आहे. डॉ.जीवन धांडे यांनी विद्यार्थिनींना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांनी विशेष श्रम संस्कार शिबिराचे महत्त्व सांगितले.









