जळगावकरांचा कौल महायुतीलाच ! : प्रचार शुभारंभप्रसंगी रवींद्र चव्हाणांचा आशावाद
Jalgaon voters will support the Mahayuti alliance! : Ravindra Chavan’s optimistic statement at the campaign launch जळगाव (5 जानेवारी 2025) : जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुती जोरदार निवडून येणार, यामध्ये मला काही शंका नाही. 2047 ला एक विकसित भारत म्हणून आपल्याला पाऊल उचलायचे आहे. त्यासाठी महायुतीचे नेते जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आपली साथ हवी आहे, अशी भावनिक साद भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येथे घातली. जळगाव महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह रविवारी पिंप्राळा भागातील भवानी माता मंदिर परिसरातून करण्यात आला. यावेळी रवींद्र चव्हाण बोलत होते.


