जळगावात भाजपा सुसाट : विशाल भोळे यांची बिनविरोध निवड


BJP on a roll in Jalgaon: Vishal Bhole elected unopposed जळगाव (2 जानेवारी 2026)  : जळगाव महापालिका निवडणुकीसाठी चुरस वाढली असतानाच प्रभाग 7 क मधून आमदार राजूमामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरूवातीला एक जागा बिनविरोध झाल्यानंतर आता दुसरी जागाही बिनविरोध झाली आहे. भाजपच्या दोन जागा तर महायुतीच्या पाच सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड बुधवारी निश्चित झाल्यानंतर गुरुवारी शिवसेना शिंदे गटाच्या तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. यात प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ गौरव चंद्रकांत सोनवणे यांची, प्रभाग क्रमांक 9 अ मधून मनोज चौधरी, तर प्रभाग 9 ‘ब’ मधून प्रतिभा देशमुख आणि आज 19 अ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

यानंतर आता भाजपची दुसरी जागा बिनविरोध झाली आहे. विशाल भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामुळे विशाल भोळे हे पहिल्यांदाच महापालिकाच्या माध्यमातून निवडणुकीत उभे राहिली आणि बिनविरोध निवड झाली आहेत. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट आहे.

दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. आतापर्यंत जळगाव महापालिकेत महायुतीचे सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजपचे दोन तर शिवसेना शिंदे गटाचे चार जागांचा समावेश आहे

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !