भुसावळात ‘अमृत’ चे काम थांबवण्याचे तोंडी आदेश : संतप्त भाजपा नगरसेवकांकडून मुख्याधिकार्यांना घेराव
मुख्याधिकार्यांना दोन दिवसांचा ‘अल्टीमेटम’ : राजकीय संघर्ष उफाळला : भाजपाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष
गणेश वाघ
Oral orders issued to stop the ‘Amrut’ project work in Bhusawal : Enraged BJP corporators surround the Chief Officer भुसावळ (5 जानेवारी 2025) : शहरवासी आधीच पाणीटंचाईला वैतागले असतानाच शहरात अमृत योजनेच्या सुरू असलेल्या कामाला मुख्याधिकार्यांनी ‘ब्रेक’ लावण्याचे निर्देश तोंडी दिल्यानंतर संतप्त भाजपा नगरसेवकांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातलेंना सोमवारी सकाळी फिल्टर हाऊसमध्ये घेराव घातला व प्रश्नांची सरबत्ती केली.
तर भाजपाचे तीव्र आंदोलन
भुसावळकर आधीच पाणीटंचाईला वैतागले असताना कुणाच्या सांगण्यावरून काम बंद करण्यात आले? प्रशासकीय काम करताना तोंडी आदेश चालतात का? तीन महिन्यांपूर्वीच आपल्याच पुढाकाराने काम सुरू झाले मग तेव्हा का नाही हरकत घेतली? असा प्रश्न भाजपा गटनेता युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी यांनी विचारून मुख्याधिकार्यांना निरूत्तर केले. एमजीपी अधिकार्यांशी सल्ला-मसलत करून दोन दिवसात निर्णय घेवू, असे मुख्याधिकार्यांनी सांगितल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी दोन दिवसात प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

मुख्याधिकार्यांना घेराव : प्रश्नांची सरबत्ती
सोमवारी सकाळी 11 वाजता भाजप गटनेते युवराज लोणारी यांच्या नेतृत्वात भाजपच्या नगरसेवकांनी फिल्टर हाऊसमध्ये मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. आधीच योजनेला उशीर होत असताना आता गंगाराम प्लॉट, संतोषी माता मंदिराजवळील जलकुंभाचे काम तोंडी आदेशाने बंद का करण्यात आले? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या निर्णयामागे नेमका हेतू काय? काम पुन्हा कधी सुरू होणार? आणि या विलंबाला जबाबदार कोण? आदी प्रश्नांनी मुख्याधिकार्यांच्या अडचणी वाढल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजप गटनेते युवराज लोणारी यांच्यासह नगरसेवक पिंटू कोठारी, किरण कोलते, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे आदी नगरसेवकांनी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दीपक चौधरी व सहाय्यक अभियंता अमित कोलते उपस्थित होते.
तर दोन दिवसात भाजपाचे पुन्हा आंदोलन
नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकार्यांनी दोन दिवसांत संपूर्ण माहिती देऊन कामाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याचे आश्वासन दिले. अडचणी दूर करून पाणी टाकीचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. दोन दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे. शहराच्या जीवनवाहिनी असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी तीव्र अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजप उपगटनेते परीक्षीत बर्हाटे, पिंटू कोठारी, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, किरण कोलते, विशाल नाटकर, निक्की बत्रा, आशिष पटेल, सुजित भोळे, पूजा तायडे, सोनी बारसे, अर्चना सातदिवे, सीमा नरवाडे, अॅड.बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे, मुकेश पाटील, सतीश सपकाळे, बापू महाजन, राजेंद्र नाटकर, देवा वाणी, अजय नागराणी आदी नगरसेवक व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

