भुसावळातील भोळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गुजरातमधील आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
भुसावळ (5 जानेवारी 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू हरप्रीतसिंग रंधावा (तृतीय वर्ष बी.कॉम.) आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धा एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, जळगाव येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यात उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ फुटबॉल संघात निवड झाली. पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा गुजरात येथील पारुल विद्यापीठ, वडोदरा येथे 5 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान होत आहे.
निवडीबद्दल खेळाडूचा सत्कार
खेळाडूची सलग तीन वर्ष विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजू फालक यांनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते. या यशाबद्दल विद्यापीठ क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, निवड समिती सदस्य प्रा.अख्तर खान, प्रा.डॉ.विनय पवार, महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.ए.आर.सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रकाश सावळे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


