भुसावळातील शिक्षिका पूनम फालक यांचा शिक्षा शिरोमणी पुरस्काराने सन्मान
Poonam Falak, a teacher from Bhusawal, was honored with the Shiksha Shiromani Award भुसावळ (5 जानेवारी 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका व शाहू महाराज नारी रत्न पुरस्कार प्राप्त तसेच जयलक्ष्मी अॅकेडमीच्या प्रमुख आधारस्तंभ पूनम विजय फालक यांना वर्ल्ड सेवन वंडर्स रेडीयन्ट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थेद्वारे ‘शिक्षा शिरोमणी’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
कार्याची दखल घेत गौरव
फालक यांच्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, अध्यात्मिक, कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. ही संस्था गेल्या 15 वर्षापासून अनेक कार्यरत आहे. साहित्य, शिक्षा, क्रीडा, वैद्यकीय, नृत्य, कला, संगीत, ज्योतीष अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या व्यक्तींची संपूर्ण भारतातून निवड केली जाते. प्रत्येक क्षेत्रातील फक्त पाच व्यक्तींची निवड होऊन त्यांना पुरस्कार वितरण केले जाते. हा पुरस्कार मिळणे म्हणजे आपल्या कार्याची पावती होय. पुरस्कार प्रेरणा देतात. आपल्या भावी जीवनात उत्तम उत्तम कार्य करण्यास प्रवृत्त करतात. पुरस्कार्थीची निवड ही निरपेक्ष व तसेच अनेक पैलू लक्षात घेऊन केली जाते, असे प्रतिपादन या संस्थेचे संस्थापक समाजसेवक व महान स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार्या अॅड.क्रांती महाजन यांनी नमूद केले.

पुरस्कारप्रसंगी यांची उपस्थिती
हा पुरस्कार नागपूरचे श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले, तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, भारत सुंदरी साहित्यिक व प्रा.डॉ.रुपाली वशिष्ठ, संभाजीनगरचे क्रीडा शिक्षक डॉ.पंढरीनाथ रोकडे, रामटेकचे चंद्रपाल चौकसे, हिमाचल प्रदेशचे युधिष्टीर राणा, मुंबईचे डॉ. दिगंबर तायडे, सेवन वंडरचे डॉ.अॅड.क्रांती महाजन, आशा महाजन यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
याप्रसंगी भारतातील विविध प्रांतातील, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारताना पुनम विजय फालक यांनी कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त करून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व आता आंतरराष्ट्रीय स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल परमेश्वराचे, वडीलधार्या मंडळींचे, परीवाराचे व त्यांच्यावर प्रेम करणार्या सर्व व्यक्तींचे आभार व्यक्त करून हा पुरस्कार म्हणजे फक्त ट्रॉफी व प्रमाणपत्र नसून समर्पित भावनेने केलेल्या कर्माची फळ आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. या सर्वांचे श्रेय त्यांनी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सीपल, व्हाईस प्रिन्सीपल, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, जयलक्ष्मी अॅकेडमीचे संचालक व स्टाफला दिले. पुरस्कारानंतर फालक यांच्यावर ंसर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

