भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात
Savitribai Phule Jayanti was celebrated with enthusiasm at The World School in Bhusawal भुसावळ (5 जानेवारी 2025) : भुसावळ शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन द वर्ल्ड स्कूलमध्ये पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शनिवार, 3 रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे विचार सांगून त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला व त्यांना शाब्दिक आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास शाळेचे पर्यवेक्षक, शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.


