भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयाला विद्यापीठाचा दणका : अतिरीक्त फी सह दंड विद्यार्थी कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश


Bhusawal’s Kotecha Women’s College receives a jolt from the university: Orders issued to deposit the excess fees along with the fine into the student welfare fund भुसावळ (6 जानेवारी 2026) :  भुसावळ शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाने गेल्या दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत विद्यार्थिनींकडून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रस्तावित व मंजूर केलेल्या शुल्कापेक्षा अधिकची फी आकारल्याचा धक्कादायक व तितकाच संतापजनक प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यापीठाच्या वैधानिक मंजुरीशिवाय पॉवर चार्जेस 200 रुपये तसेच इतर उपक्रम शुल्क 100 रुपये तसेच टी. वाय. बी. कॉम. विद्यार्थिनींकडून संगणक लॅब फी 500 रुपये आकारण्यात आली. या संदर्भातील तक्रारी करण्यात आल्यानंतर विद्यापीठाने चौकशीअंती 21 लाख 89 हजार 700 इतकी मूळ रक्कम तसेच त्यावर 10 टक्के दंड/व्याज म्हणून दोन लाख 18 हजार 970 इतकी रक्कम आकाल्याने सदरील जास्त आकारणी फी व दंडाची रक्कम त्वरित विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण निधीत जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिल्याची माहिती भुसावळचे माजी नगरसेवक व सी.ए.दिनेश राठी यांनी दिली आहे.

तक्रारीची विद्यापीठाकडून दखल
कोटेचा महाविद्यालयाकडून अतिरीक्त फी उकळण्यात आल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती व या तक्रारीनंतर विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीसमोर तत्कालीन प्राचार्यांनी विद्यापीठाच्या प्रस्तावित शुल्कापेक्षा जास्त फी आकारण्यात आल्याचे लेखी स्वरूपात मान्य केले. या प्रकरणाचा आर्थिक व्याप अधिक मोठा असल्याचा दावा करण्यात येत आहे.


सखोल चौकशीअंती कारवाई हवी : प्रा.राठी
दरम्यान, आणखी सुमारे 12 लाख रुपयांची विद्यापीठाच्या प्रस्तावित शुल्कापेक्षा जास्त आकारणी करण्यात आल्याबाबत स्वतंत्र अर्ज विद्यापीठाकडे सादर करण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर करावी, अशी मागणी सी.ए.दिनेश राठी यांनी केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !