जळगावकरांचा कौल महायुतीलाच ! बंडखोरांना जनतेचा थारा नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


The people of Jalgaon have given their mandate to the Mahayuti alliance! The public has no support for the rebels: Chief Minister Devendra Fadnavis जळगाव (6 जानेवारी 2026) : जळगावकरांचा कौल महायुतीलाच मिळणार असून बंडखोरांना जनता जागा दाखवेल, असा विश्वास जळागावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ झाला. यावेळी जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

बंडखोरांना कदापि थारा नाही
जळगावातील बंडखोरीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणुकीत बंडखोरी करणार्‍यांना जनता कधीही निवडून देत नाही. लोकप्रतिनिधींच्या परिवारात तिकीट द्यायचे नाही, असे आमचे धोरण ठरले होते मात्र काही ठिकाणी ऐनवेळी अर्ज भरले गेले आणि तिथे पर्यायी उमेदवार उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव काही निर्णय घ्यावे लागले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



रवींद्र चव्हाणांची टीका वैयक्तीक
भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, फडणवीसांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, रवींद्र चव्हाण यांनी काय टीका केली ती त्यांची वैयक्तिक बाब असू शकते, मात्र पक्ष विरहित आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर आहे. राज्याच्या राजकारणात त्यांचे योगदान मोठे आहे. निवडणूक काळ असूनही त्यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

जळगावात महायुतीला मिळणार यश
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीमधील एकजूट अधोरेखित केली. बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. बंडखोरांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. घराणेशाही टाळण्याचा प्रयत्न केला पण काही जागी तांत्रिक कारणांमुळे उमेदवार कायम ठेवावे लागले, असेही ते म्हणाले. आगामी पाच वर्षात जळगावचा कायापालट करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !