प्रथमच राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर परिचय मेळावाचे आयोजन
यावल (7 जानेवारी 2026) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगांव संचलीत व जिल्हा दिव्यांग पुनर्रवसन केंद्र जळगांव यांच्यावतीने राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर परिचय मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता नाव नोंदणी केंद्र यावल येथील पंचायत समितीच्या व्यापारी संकुलात सुरू करण्यात आली आहे.
प्रथमच वधू-वर विवाह
इंडीयन रेडक्रॉस सोसायटी जळगाव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्रवसन केंद्र जळगावमार्फत जानेवारी 2026 मध्ये प्रथमच राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा होत आहे. यात जिल्हाभरातून ईच्छुक दिव्यांग वधू-वरांची नोंदणी करण्यासाठी तालुका प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. यावल तालुक्यासाठी अरुण शामराव पाटील (नायगांवकर) यांची नेमणूक झाली आहे व नाव नोंदणी केंद्र पंचायत समिती यावल येथील बहुउदेशीय गाळा क्रमांक 1 येेथे सुरू करण्यात आली.

इच्छुक दिव्यांग वधू-वरांनी आपला संपूर्ण बायोडाटा / फोटो / आधारकार्ड / व दिव्यांग युडीआयडी सर्टीफिकेटसह नांव नोंदणी करून घ्यावी, असे अवाहन अरुण पाटील यांनी केले आहे.

