भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सचिन चौधरी

उपगटनेतेपदी सोहेल पठाण तर प्रतोदपदी उल्हास पगारे यांची निवड


Sachin Chaudhary appointed as the Nationalist Congress Party’s group leader in Bhusawal भुसावळ (7 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने आपल्या गटातील नगरसेवकांची नोंदणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यावेळी गटनेतेपदी सचिन संतोष चौधरी तर उपगटनेतेपदी सोहेल पठाण व प्रतोदपदी उल्हास पगारे यांची निवड करण्यात आली.

गट नोंदणीमुळे नगरसेवकांना मिळाले बळ
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) च्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या नोंदणीमुळे भुसावळ नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे.

सचिन चौधरी गटनेतेपदी
यावेळी नगरसेवक गटनेते, उपगटनेते व प्रतोद यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. गटनेतेपदी सचिन संतोष चौधरी, उपगटनेतेपदी सोहेल खान पठाण, प्रतोदपदी उल्हास पगारे यांची निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांना विश्वासात घेवून कामे करणार : नगराध्यक्षा
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी स्पष्ट केले की, भुसावळ नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने शहराच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, एकसंघपणे विकासकामे राबवून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध : सचिन चौधरी
नवनियुक्त गटनेते सचिन संतोष चौधरी यांनी सांगितले की, भुसावळ शहराच्या विकासासाठी दिवस-रात्र काम करण्याचे आश्वासन मी भुसावळकर जनतेला देतो. या जबाबदारीसाठी माजी आमदार संतोष चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकार्‍यांचे आपण मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) च्या या नगरसेवक गट नोंदणीमुळे नगरपरिषदेतील राजकीय स्थैर्य अधिक मजबूत होणार आहे शिावय विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !