विकासकामांमध्ये अडथळा आणल्यास थेट गुन्हा दाखल करणार : भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे

14 वर्ष सत्ता असताना तेव्हा पाणी प्रश्न आठवला नाही का ?


गणेश वाघ
If anyone obstructs development work, a direct police complaint will be filed: Bhusawal Municipal Council President Gayatri Bhangale भुसावळ (7 जानेवारी 2026) : भुसावळकरांनी विकासाला कौल दिल्यानेच गरीब घरातील मुलीला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे मात्र काहींना पराभव सहन होत नाही, असे दिसते. जनतेला विकासकामे करण्याचे वचन आपण दिले असून कुणी आपली मुस्कूटदाबी केल्यास अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात आपण थेट गुन्हा दाखल करू, असा सज्जड इशारा भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांनी दिला. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या निवासस्थानी पत्रकारांच्या सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या. शहरातील संतोषी माता मंदिराजवळ जलकुंभाच्या कामाला स्थगिती का व कुणी दिली? याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाल्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे ?
अमृत योजनेच्या जलकुंभाचे प्रभाग 19 मधील संतोषी माता मंदिराजवळ काम सुरू असताना हे काम आपण दिलेल्या सूचनेनुसार बंद करण्यात आले का? असा प्रश्न ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने उपस्थित केल्यानंतर नगराध्यक्षांनी आपण 23 रोजीच पदभार घेतल्याचे सांगून आपण कुठलेही निर्देश मुख्याधिकार्‍यांना दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी सहकार्य असेल मात्र चुकीची कामे होवू देणार नाही, असे त्यांनी बजावलेे.

विकासाला बांधील : तीन ते पाच दिवसाआड पाणी देणार
भुसावळकरांना निवडणुकीत दिलेले वचन आपण निश्चितपणे पाळणार असून तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल शिवाय विकासकामांनाही आपले प्राधान्य असेल, असे नगराध्यक्षा म्हणाल्या. पालिकेत काम करताना कुणी दबाव वा दडपशाही करीत असल्यास त्यांचा आपण कडाडून विरोध करू व प्रसंगी गुन्हादेखील दाखल करू, असा आक्रमक पवित्राही भंगाळे यांनी बोलून दाखवला. माजी आमदार चौधरी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या चांगल्या कामांप्रमाणेच चांगली कामे करण्यावर आपला भर असेल, असे त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !