पाचशे रुपयांची लाच घेताना नरडाण्यातील वायरमन धुळे एसीबीच्या जाळ्यात
A wireman from Nardana was caught in the Dhule ACB’s trap while accepting a bribe of five hundred rupees धुळे (7 जानेवारी 2026) : कमर्शियल वीज मीटर बसवण्याच्या मोबदल्यात पाचशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना नरडाणा उपविभाग ग्रामीण कक्ष क्रमांक एकचे वायरमन साहिल मेहमूद मन्यार (21, शिंदखेडा) यांना धुळे एसीबीने सापळा रचून अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांच्या बहिणीचे नरडाणा येथील गांधी चौकात ग्रामपंचायतीच्या जागेत ब्युटी पार्लर आहे व या दुकानात वाणिज्य (कमर्शियल) वीज मीटर बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कोटेशन व आवश्यक कागदपत्रे 24 डिसेंबर रोजी देण्यात आले मात्र त्यानंतरही वीज कनेक्शन जोडण्यात न आल्याने तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर मंगळवार, 6 जानेवारी रोजी वायरमन साहिल मन्यार यांनी फोनवरून पाचशे रुपयांची लाच मागणी केल्याने धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच तडवी यांना अटक करण्यात आली. तडवी यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळ यशस्वी केला.

