जळगावात मनसे कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या
जळगाव : शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ श्याम दीक्षीत या मनसे कार्यत्याची डोक्यात दगड टाकून हत्या झाल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोघा मित्रांमध्ये मद्य प्राशन केल्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. श्याम व त्यांच्या सोबतच्या एका मित्राने रात्री मद्यप्राशन केल्यानंतर उभयतांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याचे समजते. मृत श्याम यांच्या आई व बहिणीला ही घटना कळताच त्यांनी मृतदेह पाहून हंबरडा फोडला.
जळगावात मनसे कार्यकर्त्याच्या हत्येचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा- https://youtu.be/nEM4FkT3jaM
आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही
श्याम शांताराम दीक्षीत यांच्या मारेकर्यांना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दीक्षीत यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी दिला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मनसे पदाधिकार्यांसह नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.