दोन कारच्या भीषण अपघातात महिलेसह चौघे ठार


Four people, including a woman, were killed in a horrific accident involving two cars नाशिक (8 जानेवारी 2026) : दोन कारमध्ये झालेल्या धडकेत महिलेसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक- पेठ रस्त्यावर चाचडगाव टोल नाक्यापुढे आंबेगण शिवारात घडली. या अपघात आठ जण जखमी असून यातील चार महिला गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवार, 7 रोजी दुपारी 3 वाजता हा अपघात झाला. मृत राजस्थान तसेच गुजरातच्या सिल्वासामधील असून त्यातील दोघांची ओळख पटली आहे.

असा घडला अपघात
नाशिककडून पेठकडे जाणारी स्कॉर्पिओ (जी. जे. 15, सी.आर.7964) ओव्हरटेक करत असताना तिने पेठकडून नाशिककडे येणार्‍या कारला (डी.डी. 01, ए.ए.9013) धडक दिली. यात स्कॉर्पिओतील छोगालाल हिरालाल गुर्जर (वय 75, रा.देवगड, राजसमंद, राजस्थान) तर दुसर्‍या कारचा चालक शाहरुख खान फराकत (वय 28, रा. सिल्वासा) याच्यासह अन्य एक महिला व एका प्रवाशासह 4 जागीच ठार झाले. दोन्ही वाहनांचे पत्रे कापून जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यात आले.

समोरील कारने दिली धडक
शिर्डी येथून दर्शन करुन वापीकडे कारने भाविक जात असताना अचानक समोरुन येणार्‍या कारला धडक दिल्याने मोठा आवाज झाला. तोंडाला- हाताला गंभीर जखमा झाल्याचे एका जखमीने सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !