भुसावळात काम अपूर्ण असतानाही बॉटनिकल गार्डनचे उद्घाटन : मुख्याधिकार्‍यांसह अभियंत्यावर कारवाईचे निर्देश

शासनाच्या नियमांना हरताळ ; उद्घाटन व लोकार्पण बेकायदेशीर : दिनेश उपाध्याय यांची तक्रार


भुसावळ (9 जानेवारी 2026) : भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने शासनाच्या स्पष्ट नियमांचे उल्लंघन करत शहर हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मधील बॉटनिकल गार्डन प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी व नगर अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असून, याबाबत नगर विकास विभागाने गुरुवारी जिल्हाधिकारी, जळगाव यांना निर्देश दिले आहेत.

असे आहे प्रकरण
प्राप्त माहितीनुसार, सदर बॉटनिकल गार्डन प्रकल्पाचे काम पूर्ण न होता तसेच उेाश्रिशींळेप उशीींळषळलरींश न घेता उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. शासनाच्या बांधकाम नियमावलीनुसार कोणत्याही शासकीय अथवा नगरपरिषदेच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत परवानगी आवश्यक असते मात्र भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने ही परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकरणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला असून, उद्घाटनावेळी झालेल्या खर्चासह शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर नगर विकास विभागाने संपूर्ण प्रकरणाची दखल घेत चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. भुसावळातील पं.दिनेश शंकरलाल उपाध्याय यांनी या संदर्भातील तक्रार केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !