जळगावातील 27 बंडखोरांची भाजपाकडून हकालपट्टी
The BJP has expelled 27 rebels from Jalgaon जळगाव (9 जानेवारी 2026) : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरांमुळे महायुतीला फटका न बसण्यासाठी 27 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाच्या कारवाईमुळे बंडखोरांना मोठा धक्का बसला आहे.
पक्षाची सुरू होती दिशाभूल
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही इच्छुकांनी उमेदवारी मागे न घेता बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.

पक्ष विरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी
प्रचारादरम्यान संबंधित सर्व अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक स्वतःला भाजपशी संबंधित असल्याचे भासवत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पक्षविरोधी कारवाया करणार्या तब्बल 27 जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. या तडकाफडकी कारवाईमुळे भाजपमध्ये शिस्त राखण्याचा संदेश देण्यात आला. महापालिका निवडणुकीत कोणतीही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी भाजप नेतृत्व ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यांची झाली भाजपमधून हकालपट्टी
जितेंद्र भगवान मराठे, संगीता गोकूळ पाटील, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, गणेश दत्तात्रय बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शांताराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, मयूर श्रावणी बारी, तृप्ती पांडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील, गिरीश कैलास भोळे, कैलास बुधा पाटील, हेमंत सुभाष भंगाळे, प्रिया विनय केसवानी, रूपाली स्वप्नील चौधरी, अंजू योगेश निंबाळकर, मयुरी जितेंद्र चौथे, जयश्री गजानन वंजारी, ज्योती विठ्ठल पाटील, उज्ज्वला संजय घुगे, दिनेश मधुकर ढाकणे, कोकिळा प्रमोद मोरे.

