जळगावातील 27 उपद्रवींना नऊ दिवस शहरबंदी : प्रांतांचे आदेश


27 troublemakers in Jalgaon have been banned from the city for nine days : Sub-divisional officer’s orders जळगाव (9 जानेवारी 2026) : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या व निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जळगाव शहरातील 27 सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांसाठी शहरबंदी करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी याबाबतचे आदेश काढले आहते.

या भागातील उपद्रवींवर कारवाई
रामानंदनगर, जिल्हापेठ, एमआयडीसी व शनी पेठ पोलिस हद्दीत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या 27 जणांविरोधात पोलिसांनी कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर, प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी गुरुवारी या गुन्हेगारांना शहरबंदी केली.

यामध्ये कारवाई 8 ते 17 जानेवारी या कालावधीसाठी आहे. हद्दपारी झालेल्या व्यक्ती महापालिका निवडणुकीसाठी मतदार असतील, तर त्यांना मतदानाच्या दिवशी 15 जानेवारीला जळगाव शहरात केवळ दोन तासासाठी येता येणार आहे. या आदेशानुसार, अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तलाठ्यावर हल्ला करणार्‍या व्यक्तीवर देखील हद्दपारीची कारवाई झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !