शिकवणीला जाणार्‍या अल्पवयीन मुलीवर अपहरण करीत अत्याचार


बीड (9 जानेवारी 2026) : बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिकवणीसाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर डोंगराळ भागात अत्याचार करण्यात आला. आरोपीविरोधात केज पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले चिमुकलीसोबत ?
केज तालुक्यातील एका गावात राहणारी पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे ट्युशनसाठी घराबाहेर पडली होती. याच वेळी तिच्या ओळखीच्या एका तरुणाने कारमधून तिला फिरायला नेण्याचा बहाणा केला. ओळखीचा असल्याने आणि विश्वासात घेऊन आरोपीने मुलीला कारमध्ये बसवले मात्र तिला ट्युशनऐवजी तालुक्याबाहेरील डोंगराळ आणि निर्जन भागात नेण्यात आले.

तरुणाविरोधात गुन्हा
निर्जन ठिकाणी एकांताचा फायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अत्यंत घाबरलेल्या आणि मानसिक धक्क्यात असलेल्या मुलीने घरी पोहोचताच घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीने दिलेल्या माहितीनंतर पालकांनी तात्काळ केज पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा सर्वदूर संताप व्यक्त होत असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !