कोळन्हावीजवळ दुचाकीच्या धडकेत तरुणी जखमी


A young woman was injured in a motorcycle accident near Kolhanvi यावल (9 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावाजवळ चोपडा रस्त्यावर पायी शेतातून परतत असलेल्या एका तरुणीला अज्ञात दुचाकी स्वाराने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला अपघात
कोळन्हावी, ता.यावल या गावात चोपडा जाणार्‍या रस्त्यावर राजू तारे यांच्या शेताजवळून रमाबाई भोई व त्यांची पुतणी विजया सुरेश भोई या शेतातून घरी येत होत्या. दरम्यान त्यांना भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात दुचाकी स्वाराने मागून धडक दिली. या अपघातामध्ये विजया भोई ही गंभीर जखमी झाली. तिला उपचारांकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रमाबाई भोई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी चालका विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !