मनवेल येथील विवाहितेचा सहा लाखांसाठी छळ : जळगावच्या तिघांविरुद्ध गुन्हा


Married woman from Manvel harassed for six lakhs: Case registered against three people from Jalgaon यावल (9 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील मनवेल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा सहा लाखांसाठी पतीसह तिघांनी छळ केला. व तिला माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे छळ प्रकरण?
मनवेल, ता.यावल येथील माहेर असलेल्या पल्लवी विश्वेश पाटील (26) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह जून 2021 मध्ये विश्वेश बाळासाहेब पाटील (दादावाडी, कृष्णपुरम जैन मंदिराशेजारी, जळगाव) यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती विश्वेश पाटील, सासू छायाबाई पाटील व सासरे बाळासाहेब पाटील या तिघांनी पतीला मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी माहेरून सहा लाख रुपये आणावे यासाठी तिचा छळ केला. व पैसे दिले नाही म्हणुन तिला माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहील गणेश करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !