यावल शहरात नियम मोडणार्या बेशिस्त दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई
In Yawal city, punitive action is being taken against undisciplined two-wheeler riders who violate traffic rules यावल (9 जानेवारी 2026) : यावल शहरात गुरुवारी येथील वाहतूक पोलीस पथकाच्या वतीने विना क्रमांकाची वाहन व बेशिस्त वाहन धारकांविरुद्धच्या दंडात्मक कारवाई केली. दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या या कारवाईत 46 दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईत करण्यात आली.आहे.
कारवाईने उडाली खळबळ
यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात बेशिस्त व वाहतुकीचे नियम न पाडणार्या वाहनधारकांवर कारवाईची विशेष मोहिम राबवण्यात आली. बुधवार व गुरूवार या दोन दिवसात तब्बल 46 वाहन धारकांना दंड ठोठावण्यात आला. शहरातील बुरूज चौक, भुसावळ टी-पॉईट, फैजपूर रोड, चोपडा नाका या ठिकाणी शहर वाहतुक पोलिसांकडून चेेक पॉईट लावण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या व फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस कर्मचारी अर्षद गवळी, सचिन पोळ, पोलीस कर्मचारी अनिल पाटील, पोलीस कर्मचारी मुकेश पाटील यांच्यासह आदी पोलीस कर्मचार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

