आमदार राजूमामा भोळेंप्रमाणे विशाल भोळे उमटवताय राजकीय ठसा


Like MLA Rajumama Bhole, Vishal Bhole is also making his mark in politics. जळगाव (9 जानेवारी 2026) : राजकारणात वारसा मिळत असलातरी विश्वास मात्र आपल्या कृतीतून कमवावा लागतो. जळगाव महापालिकेचा आखाडा पेटल्यानंतर महायुतीच्या विजयासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी कंबर कसली आहे. त्या सोबतच त्यांच्या कार्याला त्यांचे पूत्र तथा महापालिकेत नुकतेच बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक विशाल भोळे यांनीदेखील हातभार लावला आहे. आपल्या कर्तृत्वावरून विशाल भोळेदेखील राजकीय ठसा उमटवत आहे. आमदार असलेल्या राजूमामा भोळे यांच्याप्रमाणे त्यांचाही दांडगा जनसंपर्क आहे.

सहज उपलब्ध होणारा नेता
जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांची ओळख एक ‘सहज उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी’ अशी आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी त्यांचे आपुलकीचे नाते आहे. मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीच्या सुखात किंवा दुःखाच्या प्रसंगात आ. भोळे यांची उपस्थिती कायम असते. जनतेच्या अडचणी सोडवणे हेच प्रथम कर्तव्य या भावनेतून त्यांचे घर आणि कार्यालय नागरिकांसाठी 24 तास खुले असते.

नगरसेवक विशाल भोळे यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून त्यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता महानगरपालिकेच्या माध्यमातून जळगाव शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ते कार्य करणार आहेत.

सुखात आणि दुःखात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची भोळे परिवाराची परंपरा आहे. विशाल भोळे यांच्या निवडीमुळे महापालिकेत नवीन ऊर्जा आणि विकासाची दृष्टी मिळणार आहे. अडीअडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी भोळे यांचे कार्यालय हा मोठा आधार बनले आहे. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. राजूमामा भोळे आणि नगरसेवक विशाल भोळे ही पिता-पुत्राची जोडी आता एकाच वेळी शासन आणि प्रशासन पातळीवर सक्रिय झाल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !