नंदुरबार शहर ठाण्याच्या निरीक्षकपदी निलेश देसले तर शहादा निरीक्षकपदी हेमंतकुमार पाटील
नंदुरबार जिल्ह्यातील चौघा अधिकार्यांच्या बदल्या : पोलिस अधीक्षकांचे आदेश
Nilesh Desle has been appointed as the inspector of Nandurbar city police station, while Hemantkumar Patil has been appointed as the inspector of Shahada police station नंदुरबार (9 जानेवारी 2026) : नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील चार अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी काढले आहेत. बदली झालेल्या अधिकार्यांनी तत्काळ आपला पदभार सोडून बदली ठिकाणी रूजू होण्याचे आदेशात नमूद आहे.
या अधिकार्यांच्या बदल्या
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची शहादा शहर पोलीस ठाण्यात तर शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांची नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा विशेष शाखेचे धर्मराज भरतसिंग पटले यांची नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली तसेच नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक रितेश नाना राऊत यांच्याकडे अपर पोलिस अधीक्षकांचे रिडर म्हणून अतिरीक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

