फ्रीजचा अचानक स्फोट : वडिलांसह दोघा मुलांचा दुर्दैवी मृत्यू
Refrigerator explodes unexpectedly: Father and two sons tragically die मुंबई (10 जानेवारी 2026) : कुटूंब गाढ झोपेत असताना फ्रिजचा अचानक स्फोट झाल्यानंतर आग लागून दोन पुरूषांसह महिलेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात पहाटेच्या सुमारास घडली.
भगतसिंग नगर येथील एका सोसायटीत शनिवारी पहाटे तीन वाजता घडलेल्या घटनेत संजोग पावस्कर (वडील) आणि त्यांची दोन मुले हर्षदा पावस्कर (19) व कुशल पावस्कर (12) यांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लहान मुलांनी धडपड केली. 12 वर्षांचा कुशल आग टाळण्यासाठी घरातील बाथरूममध्ये जाऊन लपला होता मात्र प्लास्टिक शीटमुळे आग वेगाने पसरली आणि धुराचे लोट वाढल्याने मुलांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला.

कुटूंब गाढ झोपेत असतानाच दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास घडली. पावस्कर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घरातील फ्रिजचा मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच घराला आगीने वेढले. घराला प्लास्टिक शीट लावलेली असल्याने आगीचा भडका अधिकच उडाला. घरातून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा बाहेर पडताना दिसताच शेजार्यांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
तिघांचा मृतदेहच आढळला
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत घरातील तिघेही जण मृत अवस्थेत आढळून आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही पीडितांचा मृत्यू आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून झाल्याची शक्यता आहे.

