महापालिकेत सत्ता दिल्यास पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो मोफत : अजित पवारांची घोषणा


If given power in the municipal corporati पुणे  (10 जानेवारी 2026) : पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता दिल्यास मोफत बस सेवेसह मोफत मेट्रो सेवा देणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची आता सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे.

जाहीरनाम्यानंतर उंचावल्या भुवया
पुणे महानगरपालिका अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे पुणेकरांचे पेट्रोलच्या स्वरूपात दररोज साडे सात कोटी रुपये वाया जातात. अशाप्रकारे वर्षाला दहा हजार आठशे कोटी रुपये पेट्रोलच्या स्वरूपात वाया जातात त्यामुळे ते पैसे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरता येतील, असा मोठा प्लॅन अजित पवारांनी सांगितला आहे. मोठ्या प्रमाणावर पीएमपीएल बस आणि मेट्रोतून प्रवास झाला तर रस्त्यावर वाहनं कमी होतील यातुन पुणे प्रदुषणमुक्त होईल. हे शक्य आहे. अनेक तज्ञांशी बोलून मी हे सांगतो आहे. आमच्या ताब्यात महापालिका दिली तर मी मोफत मेट्रो हे करून दाखवीन, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.

आम्हाला द्या संधी : अजित पवार
आम्ही पुण्यात राहतो त्यामुळे आम्हाला पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे. इतर बाहेरचे कोणी आले तर तेवढ्यापुरतेच येतील त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. मोफत मेट्रो, मोफत बस, 500 फुटांपर्यंत घरांना कर माफी, टँकर मुक्त पुणे, मोफत टॅब, शहरातील मिसिंग लिंक रोड पुर्ण करणार, कचर्‍याचे 100 टक्के वर्गिकरण करणार, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार, टेलिमेडीसन सुविधा उपलब्ध करणारं, गुंठेवारी तिनं महिन्यात पुर्ण करणार , 150 मॉडेल शाळांना मंजुरी, अशी आश्वासने अजित पवारांनी दिली आहेत.

गुन्हेगारीवर अजित पवारांची चुप्पी
पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनाही आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक असून त्या सध्या तुरुंगात आहेत. अशा पार्श्वभूमीवर, तुरुंगात असलेले उमेदवार निवडणूक लढवत असताना त्यावर पक्षाची भूमिका काय? असा थेट प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला असता पवारांनी हा मुद्दा गांभीर्याने न घेता उडवा-उडवीची उत्तरं देऊन विषय थांबवला. यामुळे पुण्यातील गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे. ज्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यावर पालकमंत्री म्हणून स्पष्ट भूमिका मांडणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !