पाईप लाईनसाठी खोदलेली चारी डोकेदुखी : भुसावळातील शांती नगरासह अनेक भागांत रस्त्यांची चाळण


The trench dug for the pipeline is causing headaches : Roads in many areas of Bhusawal, including Shanti Nagar, have been riddled with potholes भुसावळ (10 जानेवारी 2026) : भुसावळ शहरात पाईप लाईनच्या कामासाठी खोदलेल्या चारींचे योग्य पद्धतीने पुनर्भरण न केल्यामुळे भुसावळकर सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रामुख्याने शांती नगर भागात ठेकेदाराने खोदलेल्या चारी वरच्या वर बुजवल्याने हे रस्ते आता रहदारीसाठी धोकादायक बनले आहेत. पालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘जसा रस्ता फोडला, तसाच सुस्थितीत करून द्या’, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नागरिक झाले संतप्त
शहरात सध्या पाणीपुरवठा किंवा अन्य सेवांसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. शांती नगर भागात ठेकेदाराने पाईप लाईनसाठी लांबच लांब चारी खोदल्या, काम आटोपले, परंतु त्या चारी बुजवताना केवळ माती आणि दगड टाकून ‘वरवरची मलमपट्टी’ केली आहे. यामुळे पावसाळ्यात किंवा वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती खचून तेथे मोठे खड्डे तयार झाले आहेत. केवळ शांती नगरच नाही, तर शहरातील इतर ज्या-ज्या भागात पाईप लाईनचे काम झाले आहे, तिथेही हीच परिस्थिती आहे. दुचाकीस्वारांना या चारींचा अंदाज येत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात रोज घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर हे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. पालिकेच्या संबंधित विभागाने या कामाची पाहणी करून ठेकेदाराला समज देणे अपेक्षित असताना अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !