सटाणा स्टेट बँकेचे लांबवलेले एटीएम साक्रीत आढळले : 10 लाखांची रोकड सुरक्षित


The ATM stolen from Satana State Bank was found in Sakri : Rs. 10 lakhs in cash were safe धुळे (10 जानेवारी 2026) : सटाणा स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनातून पळवल्याचा प्रकार समोर आला होता तर चोरटे हे एटीएम साक्रीजवळ टाकून त्यातून रोकड काढत असतानाच काही ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी टॉर्च मारताच चोरट्यांनी ओळख उघड होवू नये यासाठी घटनास्थळावरून पोबारा केला. यावेळी साक्री पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पंचनामा केल्यानंतर एसबीआय टीमला पाचारण करण्यात आले व यावेळी दोन लॉकरमधून नऊ लाख 55 हजार 900 रुपयांची रोकड जप्त ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

असे आहे नेमके प्रकरण
सूत्रांच्या माहितीनुसार, सटाणा शहरातून चोरट्यांनी चक्क एटीएम वाहनाद्वारे लांबवले व साक्रीजवळ हे एटीएम रस्त्यावर टाकण्यात आले. चोरटे या एटीएमच्या बॉक्समधून रक्कम काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच काही ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी टॉर्च चमकल्यानंतर बिथरलेल्या चोरट्यांनी पकडले जाण्याच्या भीतीने एटीएम जागीच टाकून पोबारा केला. यावेळी साक्री पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला तसेच एसबीआय टीमला पाचारण करण्यात आल्यानंतर एटीएमच्या दोन लॉक ट्रे मध्ये तब्बल नऊ लाख 55 हजार 900 रुपयांची रोकड आढळल्याने ती ताब्यात घेण्यात आली. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम लांबवली वा चोरी नेमकी कशी झाली? याबाबत अधिक माहिती स्पष्ट होवू शकली नाही.

सटाण्यात चौथ्यांदा एसबीआय एटीएम टार्गेट
नाशिक जिल्ह्यात सटाणा येथील एसबीआय बँकेच्या एटीएमला फोडण्याच्या आतापर्यंत तीन घटना घडल्या आहेत व या माध्यमातून लाखोंची लूट झाली आहे. सुरक्षा रक्षक नसलेल्या ठिकाणी चोरटे चोरी करीत असल्याचेही यातून समोर आले आहे. यापूर्वी 19 जानेवारी 2023 रोजी सटाण्यातील मालेगाव रस्त्यावरील कृउबा परिसरातील एसबीआय एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल 13 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरली होती तर यापूर्वी याच एटीएममधून पहिल्यांदा चोवीस लाख व दुसर्‍यांदाचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. हेदेखील विशेष !


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !