धुळ्यातील तरुण गावठी कट्ट्यासह गुन्हे शाखेच्या जाळ्यात
A young man from Dhule was caught by the crime branch with a country-made pistol धुळे (10 जानेवारी 2026) : धुळे महापालिका निवडणुकीच्या धामधूमीत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शनिवार, 10 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे तरुणाला गावठी कट्टा बाळगताना अटक केली आहे. अरबाज महम्मंद शरीफ अन्सारी (22, रा.मौलावी गंज, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना धुळे शहरातील वरखेडी रोडवरील डंपींग ग्राऊंडजवळ तरुण दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर आरोपीला 40 हजार रुपये किंमतीच्या कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक निरीक्षक नामदेव सहारे, पोलिस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे व आशिषकुमार वानखेडे आदींच्या पथकाने केली.

