धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई : मुकटीजवळ 30 लाखांच्या अवैध मद्यसाठ्यासह त्रिकूटाला अटक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईने अवैध मद्य तस्कर हादरले ः तीन वाहने जप्त


Dhule Taluka police take major action : A trio arrested near Mukti with an illegal liquor stock worth 30 lakhs धुळे (10 जानेवारी 2026) : धुळे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच धुळे तालुका पोलिसांनी मुकटीजवळ गावठी दारूची चोरटी वाहतूक करताना तीन वाहनांसह तब्बल 30 लाख 17 हजारांचा मद्यसाठा जप्त केल्याने अवैध मद्य तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. ही कारवाई मुकटीजवळील हॉटेल एकताच्या आवारात शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे तालुका पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना पारोळा-धुळे रस्त्यावर ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी.एच.8891) मधून रॉकेट नावाच्या देशी दारुची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती व त्यानुसार वरिष्ठांना कल्पना देत सापळा रचण्यात आला. शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास मुकटी गावाच्या शिवारातील हॉटेल एकताजवळ पोलिसांनी छापेमारी करीत तब्बल तीन वाहने ताब्यात घेत तीन आरोपींना अटक केली.

30 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून राकेश छगनलाल जैन (35, रा.प्लॉट नं. 121, शांतीनगर, अभय कॉलेजजवळ, धुळे), दीपक अशोक शिंदे (35, रा.नथ्थूबाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे), सुदाम भुरा गोसावी (42, रा.भाटपुरा, ता.शिरपुर) यांना अटक करण्यात आली तर ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी.एच.8891), पिकअप (एम.एच.04 ए.यु.8722), स्वीप्ट (एम.एच.04 ईडी 9334), चार मोबाईल तसेच रॉकेट देशी दारूचे 124 बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 30 लाख 17 हजार रुपये आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक संजय बंबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, प्रशांत राठोड, हवालदार योगेश पाटील, हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार सोमनाथ कांबळे, हवालदार सुमित ठाकुर, हवालदार चेतन कंखरे, हवालदा मुकेश पवार, कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, रवींद्र राजपूत आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !