साकेगावात तीन वर्षीय बालकाला ट्रकने चिरडले


A three-year-old child was run over by a truck in Sakegaon भुसावळ (11 जानेवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील वीट भट्टीजवळ भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने खेळत असलेल्या एका तीन वर्षाच्या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुदैवी घटना गुरुवार, 8 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जयेश बलराम निशाद (3, रा.छत्तीसगड, ह.मु.साकेगाव ता. भुसावळ) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

असा घडला अपघात ?
जयेश निशाद हा परिवारासह वास्तव्याला होता. त्याचे आई-वडील वीट भट्टीवर काम करतात. गुरुवार, 8 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास जयेश हा खेळत असतांना भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एम.एच.19 झेड 4164) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जयेश हा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिरडला गेला आणि त्याचा दुदैवी अंत झाला. यावेळी त्याच्या आई-वडीलांनी एकच आक्रोश केला. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालक संजय पंडीत पाटील (रा.साकेगाव, ता.भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास संजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !