जनरेटर चोर 24 तासात निंभोरा पोलिसांच्या जाळ्यात
खिर्डी, ता.रावेर (12 जानेवारी 2026) : येथून जवळच असलेल्या वडगाव, ता.रावेर येथील शेत-शिवारातील तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे किर्लोस्कर कंपनीचे डिझेल जनरेटर चोरट्यांनी 9 रोजी लांबवले होते. याप्रकरणी निंभोरा पोलिसात शुभम मनोज कुमार चौधरी (नाशिक) यांनी तक्रार नोंदवली होती. निंभोरा पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला चोरी केलेल्या जनरेटरसह ताब्यात घेतले आहे. आकाश मनोहर पाटील (वडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दीपाली पाटील, ममता तडवी, अविनाश पाटील, कॉन्स्टेबल किरण जाधव, परेश सोनवणे, सुभाष शिंदे, भूषण सपकाळे, चालक सपकाळे आदींनी संशयीत आकाश मनोहर पाटील (वडगाव) यास अवघ्या 24 तासात अटक केली. तपास सहा.निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, दीपाली पाटील, ममता तडवी, हवालदार अविनाश पाटील करीत आहेत.


