भुसावळातील हिंदी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात


The birth anniversaries of Swami Vivekananda and Rajmata Jijau were celebrated with enthusiasm at the Hindi College in Bhusawal भुसावळ (12 जानेवारी 2025)  : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात सोमवार, 12 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्ताने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी दोन्ही प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आपली भावसुमने वाहिली. सर्व प्राध्यापकांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा गौरव
याप्रसंगी प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय युवक दिवस हा स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्याचा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद यांनी ज्ञानयोग भक्तियोग, तसेच कर्मयोगाद्वारे आध्यात्मिक व व्यवहारिक ज्ञान मिळवावे व आपले जीवन सार्थक करावे तसेच माता जिजाऊने जी प्रेरणा शिवाजी राजे यांना दिली त्यामुळे स्वराज्य मिळविणे शक्य झाले. त्यांचे महान कार्य करण्यासाठी सतत स्मरणात राहील, अशी माहिती सांगितली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, डॉ.प्रवीण जाधव, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल, सुनील शर्मा, प्रा.हितेश गुप्ता, अनुराग साळुंखे, निखील कुलकर्णी, बद्री प्रसाद केवट, कमल भट आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !