भाजपाला धक्का देण्यासाठी मास्टर प्लॅन : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना स्वीकृत नगरसेवक पद देण्याच्या हालचाली


A master plan to shock the BJP : Moves are underway to give the nominated corporator position to former Bhusawal MLA Santosh Chaudhary भुसावळ (13 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेत भाजपाचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले असलेतरी नगराध्यक्ष पदावर भाजपा उमेदवाराचा पराभव झाला माव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री भंगाळे विजयी झाल्या. भुसावळात सत्ता पालट झाल्याने माजी आमदार संतोष चौधरी यांचे राजकीय वजन वाढल्याने ते आता भाजपाला धक्का देण्यासाठी मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असून पालिकेच्या कारभारात थेट हस्तक्षेप करता यावा म्हणून ते स्वतः स्वीकृत नगरसेवक होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृतरित्या निर्णय झाला नसलातरी मंगळवारी सायंकाळपर्यंत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

आज अंतिम निर्णय होणार
माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर ते म्हणाले की, अंतिम निर्णय झालेला नाही मात्र चर्चा सुरू असून मंगळवारी सायंकाळी सर्वांच्या संमतीने योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगून स्वीकृत नगरसेवक पदाचा वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.

विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी मास्टर स्ट्रोक
भुसावळ शहरातील राजकारणात स्थान निर्माण करण्यासह आगामी काही दिवसातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चौधरी यांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केल्याने काही महत्वाचे निर्णय ते नगराध्यक्षांसोबत स्वतः घेवू शकतील.

माजी आमदार संतोष चौधरी नेते असले तरी पालिकेच्या कारभारात ते थेट सहभाग घेऊ शकत नाही. स्वीकृत नगरसेवक पदानंतर त्यांना थेट सहभाग घेता येईल. विरोधकांसह प्रशासनावर अंकुश ठेवता येईल. ते यापूर्वी नगराध्यक्ष राहिल्याने कामाचे बारकावे त्यांना माहित आहे.
परिणाम: राजकारणात नवागत असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा ते पालिकेच्या सभेत बचाव करू शकतील. विरोधकांच्या प्रश्नांना नगराध्यक्षांसोबत ते उत्तरे देवू शकतील. पालिकेतील विरोधी भाजप नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा ते थांबवू शकतील.

अनिल चौधरी यांच्या नावावरही सुरू आहे चर्चा
माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीकडून चर्चेत आले आहे. विरोधकांना धक्का देण्यासाठी ऐनवेळी अनिल चौधरी यांचे नावही पुढे येऊ शकते. यासोबत राष्ट्रवादीच्या गटातून दुर्गेश ठाकूर यांचे नावही चर्चेत आहे मात्र पालिकेच्या कामकाजाची घडी योग्य पद्धतीने बसावी यासाठी स्वतः संतोष चौधरी यांनी स्वीकृत नगरसेवकपद घ्यावे, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !