नंदुरबार शहरात आयकर विभागाची धाड : उद्योजकांच्या गोटात प्रचंड खळबळ


Income Tax Department raids in Nandurbar city: Causing a huge stir among businessmen नंदुरबार (13 जानेवारी 2026) : नंदुरबार शहरातील एका उद्योजकाकडे आयकर विभागाच्या पथकाने सोमवारी धाड टाकत तपासणी केल्यानंतर व्यापारीवर्गात प्रचंड खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव व नाशिक येथील अधिकार्‍यांचा या तपासणी पथकात समावेश होता. दिवसभर पथकाने तपासणी करीत 55 लाख रुपये भरण्याची नोटीस संबंधिताना दिल्याची माहिती आहे.

उद्योजकांच्या गोटात प्रचंड खळबळ
नंदुरबारात सोमवारी सकाळी नाशिक विभागाचे आयकर आयुक्त सायली संजय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयकर विभागाचे पथक दाखल झाले. पथकाने शहरातील एका उद्योजकाच्या घरात पथकाने धाड टाकली. सोमवारी सकाळी अचानक पडलेल्या धाडीमुळे आणि तपासणीमुळे संबंधितही धास्तावले. परंतु पथकाला सहकार्य करून त्यांनी तपासणी करून देत सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. आयकर पथकाची धाड पडल्याचे शहरात समजताच व्यापारी अणि उद्योजकांमध्ये खळबळ उडाली.

अनेक व्यापारी बाहेरगावी
आयकर विभागाचे पथक शहरात आल्याचे कळताच काहींनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली तर काहींनी बाहेरगावे जाणे पसंत केल्याचे सांगण्यात आले. पथकाने संबधित उद्योजकाकडे केलेल्या तपासणीत 55 लाखांचा आयकर भरला नसल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक कागदपत्रे घेऊन आणि नोटीस बजावून पथक सायंकाळी रवाना झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !