धुळे महानगरपालिका निवडणूक : 18 उपद्रवींना मतदान प्रक्रियेपर्यंत शहरबंदी
Dhule Municipal Corporation Election: 18 troublemakers banned from the city until the completion of the voting process धुळे (13 जानेवारी 2026) : धुळे महानगरपालिका निवडणूक शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी काटेकोर नियोजन केले आहे. कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणार्या तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणार्या चाळीसगाव रोड व देवपूर ठाणे हद्दीतील 18 उपद्रवींना 12 ते 16 दरम्यान शहर बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश धुळे जिल्हा अपर पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत. केवळ मतदानाच्या दिवशी 15 रोजी सकाळी सकाळी सात ते नऊ दरम्यान त्यांना मनपा हद्दीत मतदानासाठी प्रवेश करता येईल मात्र धुळे तालुका क्षेत्रात उपस्थित राहण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
चाळीसगाव रोड हद्दीतील या उपद्रवींना बंदी
हाशिम मलक अब्दुल रहमान (30, रा.मिल्लत नगर, अबुबकार मस्जिद जवळ, धुळे), जावेद ऊर्फ नकटया मोहम्मद शेख (सुलतानिया मदरसा जवळ, जामचा मळा, धुळे), अहाद आबीद हुसेन अन्सारी (हाजी नगर,
धुळे), अरबाज शेख साजीद मन्यारी (हाजी नगर, धुळे), रेहान खान फरदीन खान पठाण उर्फ पोपण्या (अंबिका नगर, धुळे), वसीम उर्फ वड्या सलीम रंगरेज (रा.शब्बीर नगर, 100 फुटी रोड, धुळे), सोहेल आरीफ शाह (रा.जनता सोसायटी, हजरत अली मस्जिदजवळ, धुळे), शाकीर शाह रमजान शाह उर्फ भुर्या (कबीरगंज, धुळे), बिलाल सुबराती शाह (80 फुटी रोड, धुळे), जाहीद उर्फ नाट्या हुसेन सुलतान अन्सारी (हाजी नगर, धुळे), फिरोज चिवडा उर्फ नासीर खान पठाण, (पूर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे)

देवपूर हद्दीतील या उपद्रवींना शहरबंदी
नरेश कांतीलाल गवळी (25, रा.नरडाणा, चौफुली देवपूर, धुळे), आकाश उमेश पानथर (रा.विद्यानगर, देवपूर), रोहित रवीकांत सानप ( विघ्नहर्ता कॉलनी, देवपूर, धुळे), ऋषभ ऊर्फ किरण मनोहर शिरसाठ (प्रियदर्शनी नगर, नगावबारी देवपूर, धुळे), अक्षक विजय जोशी (आंबाजी नगर देवपूर), नितीन एकनाथ पाटील (शांती निकेतन कॉलनी, वलवाडी देवपूर, धुळे), विशाल ऊर्फ विक्की उमेश पाटील (गदमाळी सोसायटी देवपूर, धुळे)
दरम्यान, ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी त्यांना प्राप्त कलम बीएनएसएस 163 अन्वये प्राप्त अधिकारान्वये केली आहे.

