जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला ; राज्यात 5 फेब्रुवारीला मतदान


The election process for Zilla Parishad and Panchayat Samiti elections has begun; voting will be held on February 5th in the state मुंबई (13 जानेवारी 2026) : राज्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 रोजी निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केली.

आदर्श आचारसंहिता लागू
आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा मंगळवार, 13 रोजी करण्यात आली.

उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन स्वीकारणे – 16 जानेवारी ते 21 जानेवारी

उमेदवारी अर्जांची छाननी – 22 जानेवारी 2026

अर्ज माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत

अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप – 27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर

मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत

मतमोजणी 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपासून

दुसर्‍या टप्प्यात इतर जिल्हा परिषद
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसर्‍या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे मात्र राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. त्याविषयी काहीही निर्णय करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असेही दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !