थाळनेर पोलिस ठाण्याचे नूतन प्रभारी हेमंत पाटील यांनी स्वीकारला पदभार
Hemant Patil has taken charge as the new in-charge of Thalner Police Station थाळनेर (12 जानेवारी 2026) : लाच प्रकरणात चौघा कर्मचार्यांवर कारवाई झाल्यानंतर कर्मचार्यांवर नियंत्रण न ठेवल्याने थाळनेर प्रभारी शत्रूघ्न पाटील यांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबन केले होते व रिक्त जागेवर शिरपूरचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील यांची प्रभारीपदी नियुक्त केली होती. मंगळवार, 13 रोजी सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील यांनी थाळनेर पोलिस ठाण्याची धूरा सांभाळली आहे.
रिक्त जागेवर नूतन अधिकारी रूजू
अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना थाळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (33, शिवप्रसाद नगर, शिरपूर, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली तर अन्य तीन कर्मचार्यांचाही सहभाग आढळल्याने त्यांच्याविरोधात शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. थाळनेर प्रभारी अधिकारी शत्रूघ्न पाटील यांच्यावर स्लॅक सुपरव्हीजनचा ठपका ठेवत त्यांनादेखील या प्रकरणात निलंबित होण्याची वेळ आल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली होती.

दरम्यान, थाळनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहाय्य निरीक्षक हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

