यावल शहरात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय भरड धान्य खरेदीचा शुभारंभ


यावल (14 जानेवारी 2026) : यावल शहरातील सातोद रस्त्यावर शासकिय गोदामात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत शासकीय भरड धान्य खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावर शेतकर्‍यांनी नोंदणी केलेल्या क्रमानुसार ज्वारी व मका खरेदी केला जाणार आहे. फेब्रुबारी अखेरपर्यंत येथे खरेदी चालणार आहे.

शेतकर्‍यांना मोठा दिलासा
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजने खरेदी योजनेनुसार शेतकर्‍यांच्या हितासाठी शासकीय भरड धान्य केंद्राचा शुभारंभ सोमवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता यावल येथील शासकीय गोदामात करण्यात आला. याप्रसंगी काटा पूजन व धान्य पूजन रावेर यावल विधानसभेचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेवरून प्रथम आलेले दहिगावचे शेतकरी भास्कर नागो फेगडे यांच्याहस्ते करण्यात आले. हे केंद्र कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पुरवठा अधिकारी अभिमन्यू चर्‍हाटे, गोदाम अधीक्षक वाय.डी.पाटील, सुकलाल कोळी, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्जैनसिंग राजपूत, कृषिभूषण नारायण चौधरी, बाजार समिती संचालक हर्षल पाटील, सागर महाजन, शेतकी संघ संचालक तेजस पाटील, कोरपावली सोसायटीचे सचिव मुकुंदा तायडे यांसह तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

586 शेतकर्‍यांची नोंदणी
या केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमतीत खरेदी केल्या जाणार्‍या भरड धान्यात तालुक्यातील 194 शेतकर्‍यांनी मका नोंदणी केली आहे. 392 शेतकर्‍यांनी ज्वारीची नोंदणी येथे केली आहे. ज्या क्रमाने नोंदणी झालेली आहे त्या त्या क्रमानुसार शेतकर्‍यांनी आपाापले धान्य घेवून येथे खरेदी साठी बोलावण्यात येणार आहे.

असा आहे भाव
या शासकिय किमान आधारभूत किंमत अंतर्गत शेतकर्‍याच्या ज्वारीला प्रति क्विंटल 3 हजार 699 रूपयाचा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच मक्याला येथे प्रति क्विंटल 2 हजार 400 रुपयांचा दर निश्चित आह व ही रक्कम शेतकर्‍यांचे धान्य खरेदी झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती कोरपावली विकासो चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !