धुळे गुरुद्वारातील दंगल प्रकरण : संशयीत रणबीर खालसाच्या घरातून महागड्या पिस्टलसह रायफल जप्त


Dhule Gurdwara riot case : A rifle along with an expensive pistol seized from the house of suspect Ranbir Khalsa धुळे (13 जानेवारी 2026) : धुळ्यातील गुरुद्वारात झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपी रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा याच्या गुरुद्वारातील निवासस्थानातून पोलिसांना तब्बल 43 जिवंत काडतूस व दोन मॅग्जीन जप्त करण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडीतून अटक करण्यात आली होती. धुळे शहर पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना आरोपीला बोलते केल्यानंतर त्याने महागडी पिस्टल व रायफल काढून दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

आरोपीच्या अडचणी वाढल्या : दोन शस्त्र जप्त
धुळे शहर पोलिसांनी आर्म अ‍ॅक्ट व दंगलीच्या तपासार्थ आरोपीला न्यायालयीन कोठडीतून अटक केल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने चार लाख रुपये किंमतीची महागडी पिस्टल काढून दिली आहे शिवाय एक लाख रुपये किंमतीच रायफल तसेच पाच व दोन रुपये किंमतीच्या प्रत्येकी एक-एक मॅग्झीन मिळून एकूण पाच लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने हे शस्त्र कुठून व कोणत्या उद्देशाने आणले याची आता चौकशी सुरू आहे.

यापूर्वी आरोपीच्या घरातून 43 बुलेट जप्त
अटकेतील आरोपी रणबीरसिंग खालसा याच्या गुरुद्वारातील घराची पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्यातून एसएलआर रायफल गनसारख्या दिसणार्‍या आठ एमएमच्या आठ बुलेट तसेच पिस्टलसाठी लागणार्‍या 45 एमएमच्या तब्बल 35 बुलेट व दोन मॅग्झीन जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपीला हद्दपार करण्यासंदर्भात प्रांताधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील, समाधान सोळंके व शोध पथकातील कर्मचार्‍यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !