भुसावळ पालिकेच्या सभागृहात घुमणार आता माजी आमदार संतोष चौधरींचा आवाज : स्वीकृत नगरसेवकपदी निवड निश्चित !
विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी मास्टर स्ट्रोक : उद्या होणार अंतिम निर्णय
गणेश वाघ
Former MLA Santosh Chaudhary’s voice will now resonate in the Bhusawal Municipal Council hall : His selection as a nominated corporator is confirmed भुसावळ (13 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेत सत्तापालट झाल्यानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांनी राजकीय डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. गुरुवार, 15 रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड होणार आहे. विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी चौधरींनी मास्टर स्ट्रोक खेळत आता स्वीकृत नगरसेवकपद स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक वर्षानंतर आता पालिका सभागृहात चौधरींचा आवाज घूमताना दिसणार आहे.
कार्यकर्त्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय
मंगळवार, 13 रोजी माजी आमदार चौधरींच्या शनी मंदिर वॉर्डात नगरसेवकांची बैठक झाली व त्यात आगामी राजकीय भूमिकेवर मंथन करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार संतोष चौधरींना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्याचे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले तर सादर होणार्या चार नावांमध्ये संतोष छबीलदास चौधरी, अॅड.नंदिनी अनिल चौधरी, दुर्गेश ठाकूर व प्रा.उत्तम सुरवाडे यांच्या नावाचा समावेश आहे.

विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी मास्टर स्ट्रोक
भुसावळ शहरातील राजकारणात स्थान निर्माण करण्यासह आगामी काही दिवसातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चौधरी यांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर चौधरींना े काही महत्वाचे निर्णय नगराध्यक्षांसोबत स्वतः घेता येणार आहे.
राजकारण रंजक वळणावर !
माजी आमदार संतोष चौधरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असले तरी पालिकेच्या कारभारात ते थेट सहभाग घेऊ शकत नाही. स्वीकृत नगरसेवक पदानंतर त्यांना थेट सहभाग घेता येईल. विरोधकांसह प्रशासनावर अंकुश ठेवता येईल. ते यापूर्वी नगराध्यक्ष राहिल्याने कामाचे बारकावे त्यांना माहित आहे. राजकारणात नवागत असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा ते पालिकेच्या सभेत बचाव करू शकतील. विरोधकांच्या प्रश्नांना नगराध्यक्षांसोबत ते उत्तरे देवू शकतील. पालिकेतील विरोधी भाजप नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा ते थांबवू शकतील.

