दीपनगर वसाहतीत कंत्राटदाराकडे 20 हजारांची खंडणी मागितली : तिघांविरोधात गुन्हा
In the Deepnagar colony, a contractor was asked for a ransom of 20,000 rupees: a case has been registered against three people भुसावळ (14 जानेवारी 2026) : दीपनगरातील खाजगी कंत्राटदाराकडे कामासाठी माणसे लावण्यासाठी दबाव टाकत धमकावून कार्यालयात अनधिकृत प्रवेश करीत शिविगाळ व दमदाटी करून 20 हजारांची खंडणी मागणार्या तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे खंडणी प्रकरण
तक्रारदार मिलिंद गुणवंत धर्माधिकारी (51, कुलकर्णी प्लॉट, गणपती मंदीरजवळ, भुसावळ) हे खाजगी कंत्राटदार आहेत. त्यांनी भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत सम्राट बनसोडे (नाव, गाव पत्ता नाही) व त्यांच्या दोन साथीदारांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी बुधवार, 14 रोजी 3.15 वाजता धर्माधिकारी यांच्या दीपनगर वसाहतीतील कार्यालय, क्वार्टर नं.न्यु ई 38/1 येथे तक्रारदाराच्या कंपनीत त्याचे लोक कामाला लावण्याच्या आडून कार्यालयात अनधिकृत प्रवेश केला शिवाय तक्रारदाराचा रस्ता अडवत, शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन 20 हजारांची खंडणी मागितली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिल्यावरून गुरनं.09/2026 बीएनएस कलम – 308(2), 308 (5),126 (2), 333, 115 (2), 352, 351 (3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.


